गुरुकुल पब्लिक स्कूलचे 15 विद्यार्थी राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य व जिल्हा यादीत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील गुरुकुल पब्लिक स्कूलचे 15 विद्यार्थी राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य व जिल्हा यादीत आले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नितीन भोगे यांनी विशेष कौतुक केले आहे.
यामध्ये इयत्ता दुसरी युद्ध वीर नलवडे राज्यात सहावा, इयत्ता तिसरी समर्थ शेळके राज्यात सहावा, आदित्य भांगे राज्यात सातवा, त्याचबरोबर इतर विद्यार्थी नावे… इयत्ता पहिली – सर्वेश भुजंग नेटके केंद्रात दुसरा, जिल्ह्यात आठवा, राज्यात अकरावा पार्थ गेंड केंद्रात दुसरा, जिल्ह्यात आठवा, राज्यात अकरावा, अर्जुन फरतडे केंद्रात तिसरा ,जिल्ह्यात नववा ,राज्यात बारावा,. इयत्ता दुसरी – तेजस्विनी शिंदे केंद्रात पहिली, जिल्ह्यात आठवी, राज्यात दहावी, आर्यन गपाट केंद्रात तिसरा, जिल्ह्यात दहावा, राज्यात बारावा ,अथर्व मोरे केंद्रात तिसरा, जिल्ह्यात दहावा, राज्यात बारावा, इयत्ता तिसरी – शौर्य शिंदे केंद्रात पहिला, जिल्ह्यात बारावा, राज्यात पंधरावा, अदिती चेंडगे केंद्रात दुसरी, जिल्ह्यात तेरावी, राज्यात सोळावी ,स्पंदन सावंत केंद्रात पाचवी, जिल्ह्यात अठरावी, राज्यात एकविसावी, इयत्ता चौथी – सानवी नेटके केंद्रात दुसरी, जिल्ह्यात सोळावी ,राज्यात विसावी,. इयत्ता पाचवी – संचिता माने केंद्रात पहिली, जिल्ह्यात तेरावी ,राज्यात पंधरावी , इयत्ता सहावी – अथर्व चव्हाण केंद्रात दुसरा ,जिल्ह्यात सोळावा, राज्यात चोवीसवा या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुरुकुल पब्लिक स्कूल कडून अभिनंदन करण्यात आले. अनेकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.