मोटारसायमल चोरीचे सत्र चालूच – केत्तूर नं.२ येथे भरदिवसा मोटारसायकलची चोरी..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.६ : करमाळा तालुक्यात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, पुन्हा एकदा केत्तूर नं.२ येथे ३ मे रोजी भरदिवसा दुकानासमोर लावलेली मोटारसायकलची चोरी झाली आहे. यात गणेश सर्जेराव पवार (रा. पारेवाडी, ता.करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की माझे मोटारीचे सामान आणण्यासाठी केत्तूर नं.२ येथील दिलावर तांबोळी यांच्या दुकानात गेलो होतो. दुकानात ११ वाजता गेलो त्यावेळी माझी हिरो कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम.एच.४५-ए. आर. ८४९९ ही दुकानसमोर लावली होती. सामान घेऊन साडेअकरा वाजता मोटारसायकलकडे गेलो असता, लावल्या जाग्यावर मोटारसायकल दिसून आली नाही, शोध घेऊनही सापडली नाही. त्यामुळे मोटारसायकलची चोरी झाले हे स्पष्ट झाल्यावर फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे पुढील तपास करत आहेत.