पोमलवाडी व वाघाचीवाडी येथे देशीदारू पकडली.. -

पोमलवाडी व वाघाचीवाडी येथे देशीदारू पकडली..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : पोमलवाडी (ता. करमाळा) येथे राहत्या घराच्या शेजारी देशीदारू विक्रेत्यास पोलीसांनी रंगेहाथ पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ मे ला सकाळी साडेअकरा वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर सर्जेराव खैरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की पोमलवाडी येथे देशी दारू विक्री होत असल्याची माहिती समजल्यावर आम्ही गावात गेलो असता, नागेश सिताराम घाडगे (रा. पोमलवाडी) हा आपल्या घराच्या जवळ पिशवीत देशी संत्रा कंपनीच्या दारूच्या बाटल्या ठेवून दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडे बिगरपरवाना ७७० रू. किंमतीच्या ११ संत्रा कंपनीच्या बाटल्या सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत गायकवाड हे करत आहेत.

वाघाचीवाडी येथे देशीदारू पकडली…

वाघाचीवाडी (ता. करमाळा) येथे सातमित्र हॉटेलच्या पाठीमागे देशीदारू विक्रेत्यास पोलीसांनी रंगेहाथ पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ मे ला दुपारी दीड वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बबन चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की वाघाचीवाडी येथे बोरगाव रस्त्यावर सातमित्रांच्या हॉटेलच्या पाठीमागे देशी दारू विक्री होत असल्याची माहिती समजल्यावर आम्ही तेथे गेलो. तेथे दादासाहेब बबन वाघ (रा. वाघाचीवाडी) हा पिशवीत देशी संत्रा कंपनीच्या दारूच्या बाटल्या ठेवून दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडे बिगरपरवाना ९१० रू. किंमतीच्या १३ संत्रा कंपनीच्या बाटल्या सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!