केम ग्रामपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना चेकचे वाटप

केम (संजय जाधव) : केम ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग कल्याणासाठी राखीव पाच टक्के निधीतून २४ दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ९६ हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामसेवक वैभव तळेकर यांनी ही माहिती दिली.
या धनादेशांचे वाटप सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे, ग्रामपंचायत सदस्य अनंता तळेकर, नागनाथ तळेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अपंग संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, लिपीक तानाजी केंगार आणि श्री.वेदपाठक उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल दिव्यांग लाभार्थ्यांनी शासनाचे व केम ग्रामपंचायतीचे आभार मानले.



