जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींकडून सैनिकांसाठी पाठविण्यात आल्या राख्या

करमाळा(प्रतिनिधी): देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जि. प. प्रा. शाळा मारकड वस्ती (चिखलठाण, तालुका करमाळा) येथील विद्यार्थिनींनी अनोखा आणि भावनिक उपक्रम राबविला. विद्यार्थिनींनी स्वतः प्रेमाने तयार केलेल्या राख्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना पाठविल्या.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी उत्साहाने विविध रंगांच्या सुंदर राख्या तयार केल्या. या राख्यांसोबत सैनिकांसाठी प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचा संदेशही पाठविण्यात आला. “तुम्ही देशाचे रक्षण करता, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. आपल्या या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा भावनेतून विद्यार्थिनींनी सैनिकांप्रती आपले बंधुत्व व्यक्त केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांप्रती आदराची भावना निर्माण झाली. विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.
“सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतात; त्यांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.





