अधिक मासानिमित्त केमच्या विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न -

अधिक मासानिमित्त केमच्या विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

0

केम (संजय जाधव) – केम येथील विठ्ठल मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दि. १७ मे ते २३ मे दरम्यान आयोजित या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, शिवपुराण कथा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सालाबादप्रमाणे यंदाही विठ्ठल मंदिरात अधिक मासानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा, सकाळी ७ ते ९ श्रींचा अभिषेक, तर सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत शिवपुराण कथांचे आयोजन करण्यात आले. कथाकार म्हणून ह.भ.प. निवृत्ती मोहणे महाराज यांनी मार्गदर्शन केले.



या सप्ताहात गायनाचार्य ह.भ.प. रघुनाथ पाटील महाराज, तबलावादक ह.भ.प. शुभम महाराज, ऑर्गन वादक ह.भ.प. दीपक पाटील महाराज यांनी सेवा बजावली. तसेच ह.भ.प. स्वप्निल शिंदे महाराज, दादासाहेब गोपणे, अनंत सूर्यवंशी, लालासाहेब चोपडे, निंबाळकर व मच्छिंद्र भोसले यांची सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तने झाली.

काल्याचे कीर्तन रविवारी, दि. २४ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती मोहणे महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यानंतर विणा उतरवून सप्ताहाची सांगता करण्यात आली. यानंतर ह.भ.प. बलभिम बिचितकर व ह.भ.प. मच्छिंद्र तळेकर गुरुजी यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.



सप्ताहादरम्यान राजेंद्र रामचंद्र तळेकर, जोतीराम पारखे, सिद्धेश्वर बाळोबा तळेकर, सुरेश राऊत, मधुकर राऊत, रामचंद्र दौंड, जयसिंग गुटाळ, जालिंदर यादव, वाघमोडे सर, चंद्रकांत कळंबे, अनंता थोपटे, सुरेश गुटाळ, सोमनाथ गिलास, अशोक मोरे, सोपान बिचितकर, बाळासाहेब तळेकर (चेअरमन) आणि चंद्रकांत कळसाईत यांनी पंगती दिल्या.

हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी वाघमोडे सर, मच्छिंद्र तळेकर गुरुजी, शिवा तात्या दौंड, माऊली बिचितकर, रामभाऊ बिचितकर, प्रकाश बोंगाळे, महादेव बोंगाळे आणि विठ्ठल भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. मंदिराचे गुरव यांनी दररोज देवस्थान परिसरात फुलांची आकर्षक सजावट केली.

दरम्यान, काल्याच्या कीर्तन कार्यक्रमास श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला विशेष धार्मिक वातावरण लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!