धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त केम येथे भव्य रक्तदान शिबिर; २०० जणांचा सहभाग

0

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मेडिक्लोरिन ब्लड बँक, सोलापूर आणि धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर उत्साहात पार पडले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, शंभू भक्त तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात एकूण २०० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. केम परिसरातील युवक आणि शंभू भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदानात सहभाग नोंदवला.



दिव्यांग दत्तात्रय कुलकर्णी यांचे प्रेरणादायी कार्य

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे केम येथील दिव्यांग दत्तात्रय कुलकर्णी यांनी आतापर्यंत तब्बल ६६ वेळा रक्तदान करून दिव्यांगांमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या कार्याचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

रक्तदात्यांना भेटवस्तूंचे वाटप
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना जयंती उत्सव समितीच्या वतीने पाण्याचे जार, टी-शर्ट तसेच शेतकऱ्यांसाठी बॅटरी आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. शिबिराच्या यशाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!