सेवानिवृत्त शिक्षक बलभीम  भुजबळ यांचे निधन -

सेवानिवृत्त शिक्षक बलभीम  भुजबळ यांचे निधन

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, दि. १० : करमाळा येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक बलभीम तात्याबा भुजबळ यांचे आज वृद्धापकाळाने  निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. भुजबळ यांनी आपल्या प्रदीर्घ शिक्षक सेवेत करमाळा, तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमध्ये कार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जपणूक करणारे ते जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अध्यापनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत.
स्व. बलभीम भुजबळ हे माजी नगरसेविका सौ. मीरा दिलीप भुजबळ यांचे सासरे, समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप भुजबळ तसेच प्रिंटिंग असोसिएशनचे मधुकर भुजबळ यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!