शनैश्वर दिंडीचा स्नेहमेळावा उत्साहात- चिवटे फार्मवर मेळावा संपन्न

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.२५ : हिवरवाडी येथे महेश चिवटे व चिवटे परिवाराच्या वतीने चिवटे फार्मवर आयोजित…


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२५ : हिवरवाडी येथे महेश चिवटे व चिवटे परिवाराच्या वतीने चिवटे फार्मवर आयोजित करण्यात आलेला पोथरे येथील शनैश्वर दिंडीचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी भारूड, भक्तिगीत, संगीत, प्रबोधन, भजनस्पर्धा आणि स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमांनी मेळाव्याला रंगत आणली. या कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ. मोहिनी सावंत, नगरसेवक संजय सावंत, अमोल परदेशी, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, राजेंद्र रणसिंग यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जीवन का जगायचं हे एकदा कळालं की जीवनाच्या अनेक समस्या सुटत जातात आणि मग सुखाने जगण्याचे तंत्र सापडते. आपण नेमके का जगत आहोत आणि जन्माला येऊन काय करायचे आहे, याचे धोरण प्रत्येकाने पक्के ठरवले पाहिजे. एकाच परिवारात राहून रोज एकमेकांशी भांडण होत असेल, समजूतदारपणा नसेल तर तो परिवार कसला? अशा परिस्थितीत परिवाराची प्रगती कशी होणार? नाती विसरून संघर्ष सुरू राहिला की अधोगतीला सुरुवात होते,” कुटुंबातील प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान याबाबी खुप महत्वाच्या आहेत. जीवनाचा उद्देश निश्चित करून त्यानुसार वाटचाल केल्यास अनेक अडचणींवर मात करता येते. – ॲड.डॉ.बाबूराव हिरडे (शनैश्वर दिंडी चालक,पोथरे)

भजनस्पर्धेत सुनीता ढवळे प्रथम…चिवटे फार्मवर आयोजित करण्यात आलेल्या भजनस्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत२२ जणांनी भाग घेतला होता. यात सुनीता ढवळे (हाळगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अजिनाथ कडू यांनी द्वितीय, तर ॲड. प्राची सरवदे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. अशोक दळवी, रामकृष्ण रंधवे व मंगलताई करकुटे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.


मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती…
यावेळी ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, प्रा. नागेश माने, मोरेश्वर पवार, भारत वांगडे, राजेंद्र रणसिंग, एन. डी. सुरवसे, हनुमंत वारे, नानासाहेब पठाडे, बाळासाहेब गोरे, लक्ष्मण गोरे, किसन आबा झिंजाडे, हरिश्चंद्र झिंजाडे, शिवाजीराव झिंजाडे, प्रेमराज शिंदे, विशाल आबा झिंजाडे, संतोष ठोंबरे, यमाजी झिंजाडे, दत्ता महाराज नंदर्गे, सुभाष शिंदे, अमोल साळुंके, अशोक दळवी, बाळासाहेब कुलकर्णी, रामकृष्ण रंधवे, दयानंद रोही, श्रीरंग महाराज, आबासाहेब भांड, गोपीनाथ शिंदे, शहाजी रोही, शांतीलाल झिंजाडे, सारंग ढवळे, अनिल झिंजाडे, नितीन साळुंके, करण वाळुंजकर, महादेव झिंजाडे, बाळासाहेब खराडे, शहाजी झिंजाडे, नाना हिरडे, सुभेदार झिंजाडे, अशोक झिंजाडे, रंगनाथ झिंजाडे, गणेश ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे शुभारंभ व समारोप लक्ष्मण लष्कर (सर) यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब पठाडे व ॲड. प्राची सरवदे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत नरसिंह चिवटे, मंदाकिनी चिवटे, महेश चिवटे, अपर्णा चिवटे व जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी केले. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने वारकरी, भाविक व चिवटे परिवारातील सदस्यांनी एकत्र येत भक्ती, प्रबोधन आणि स्नेहाचा अनुभव घेतला. भजन, भारूड व भक्तिगीतांच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.यावेळीपरिसरातील वारकरी, भाविक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!