बांधकाम कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना केम मध्ये सुरू
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो. यामधील एक योजना म्हणजेच मध्यान्ह भोजन योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी आता गावोगावी होण्यास सुरुवात झालेली आहे. केम (ता.करमाळा) येथे उत्तरेश्वर महाराज यात्रे दिवशी या मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात झाली आहे. या जेवणाचा लाभ सर्व बांधकाम कामगार मजूर यांनी घ्यावा ही असे आवाहन कामगार आयुक्त प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना एका वेळेच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार देण्याची तरतूद आहे. या आहारात रोटी,दोन भाजी,डाळ,भात,इतर आहार दिला जातो. हे अन्न घेऊन एक गाडी प्रत्येक गावोगावी येते .प्रत्येक गावात ही योजना उपलब्ध आहे. त्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी करण्यासाठीची माहिती – Link
ग्रामीण भागातील कामगारांना कामाच्या ठिकाणी भोजन मिळत असल्याने अनेक कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होत आहे. या अन्न वाटपावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर, केम पोलीस स्टेशनचे जाधव साहेब शिंदे साहेब व इतर पोलीस प्रशासन, प्रहार संपर्कप्रमुख सागर पवार युवा नेते सागर राजे दौंड, पै. शिवाजी भैय्या पाटील पै.मदन तात्या तळेकर, चेअरमन नवनाथ खानट ,भाजप करमाळा तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, भाजप तालुका उपाध्यक्ष पै.दत्ता तळेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन रणशिंगारे केम गावातील प्रतिष्ठित नागरिक कृष्णा (पपू )राऊत ,हरी सुतार ,बापू गायकवाड ,बापू गलांडे, वसंत गुटाळ, अण्णासाहेब चौगुले, दीपक भिताडे, व इतर गावातील व बांधकाम कामगार वर्ग उपस्थित होते.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील केम गावामध्ये व आजूबाजूच्या गावांमध्ये बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. कामगार यांना लागणारे साहित्यही वाटप करण्यात आले आहे. कुणी बांधकाम कामगार वर्ग नोंदणी करायचा राहिला असल्यास त्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. प्रहार संघटना अशा कामगार वर्गाला अर्ज करण्यास मदत करेल.
– संदीप तळेकर,प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष