सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुर ताल महोत्सवाचे आयोजन

करमाळा : करमाळा शहरातील सूरताल संगीत विद्यालयाच्यावतीने सालाबादप्रमाणे येत्या ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता सुरताल संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रमकरमाळा शहरातील जिल्हा शिक्षक सोसायटी येथे होणार आहे.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व पालसप्रिया दास (धारवाड) गायन , संगीता सरकार (कोलकता) कथक नृत्य , मोउलिमा राज (कलकत्ता) भरतनाट्यम, सायंतनी चक्रवर्ती (मुंबई) भरतनाट्यम, निर्मला नेगी (स्वाईनडाऊन उत्तराखंड) कथक नृत्य इत्यादी कलाकारांचे गायन वादन व नृत्य सादरीकरण होणार आहे.
यावेळी सुरताल संगीत विद्यालयातर्फेतील दिला जाणारा मानाचा सुर ताल रसिक पुरस्कार सोलापूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना दिला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त आणि जागतिक कीर्तीचे कलावंत ज्येष्ठ गायक व संगीत तज्ञ डॉ विकास कशाळकर (पुणे)आणि ज्येष्ठ तबलावादक पं. पांडुरंग मुखडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दीदी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील, सहारा इन्स्टिट्यूट च्या अध्यक्षा डॉ श्रद्धा जवंजाळ, कृष्णा हॉस्पिटलच्या कविता कांबळे, डाॅ ॲड.बाबुराव हिरडे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, समाजसेवक श्रेणिक खाटेर, नगरसेवक महादेव फंड नगरसेवक अतुल फंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी संगीत रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी आवाहन केले आहे.



