जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु - आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती. - Saptahik Sandesh

जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु – आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती.


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू व्हावी, या संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार केला व या योजनेच्या दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता व त्या मंजुर निधीमधून योजनेची तात्काळ दुरुस्ती करून 29 गावासाठी जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे, त्याची चाचणी यशस्वी झाली असून, 20 एप्रिल पर्यंत पाणी वरकटणे (ता.करमाळा) चौफुला येथील टाकीत दाखल होईल. अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

करमाळा तालुक्यात पाऊस मागील 2023 मध्ये कमी पडल्यामुळे 2024 च्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक स्वरूपामध्ये जाणवत आहे, विविध गावांना पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागातील गावांना भीषण पाणीटंचाईच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. विविध गावातून टँकरची मागणी होऊ लागली आहे, टँकर मंजुर होत आहेत ,परंतु टँकर भरण्यासाठी आवश्यक असलेले जलस्त्रोत आटल्यामुळे जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू व्हावी या संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार केला व या योजनेच्या दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.


मंजुर निधीमधून योजनेची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. 29 गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विज बिल थकल्यामुळे योजना सुरू होणे अडचणीचे होते.या संदर्भातही आपण मार्ग काढून जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे. त्याची चाचणी यशस्वी झाली असून, 20 एप्रिल पर्यंत पाणी वरकटणे चौफुला येथील टाकीत दाखल होईल. त्या ठिकाणाहून दुष्काळी पट्ट्यातील टँकर भरण्यासाठी तो फिडर पॉईंट म्हणून आपल्याला वापरता येईल. जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे टँकरच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. असेही आ.शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!