कंदरमधील पराडे यांच्या शेतीची मध्यप्रदेशातील मान्यवरांकडून पाहणी -

कंदरमधील पराडे यांच्या शेतीची मध्यप्रदेशातील मान्यवरांकडून पाहणी

0

कंदर (संदीप कांबळे) : कंदर (ता. करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी संदीप पराडे यांच्या शेतातील केळी, डाळिंब व अद्रक या विविध पिकांची मध्यप्रदेशातील मान्यवरांनी पाहणी करून शेतीतील आधुनिक प्रयोगांचे कौतुक केले.



मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील भाजप आमदारांच्या सुपुत्र समर्थ चिटणीस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पराडे यांच्या शेताला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी समिती सभापती किशोर पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहुल पाटील (बुऱ्हाणपूर), जळगाव येथील शेतकरी व केडी एक्सपोर्टचे किरण डोके, जैन इरिगेशनचे ॲग्रोनॉमिस्ट किरण पाटील तसेच रमेश पराडे उपस्थित होते.


पराडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जोपासलेल्या केळी, डाळिंब व अद्रक पिकांची गुणवत्ता, सुदृढ वाढ आणि व्यवस्थापन पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः समर्थ चिटणीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी पराडे यांच्या मेहनतीचे व शेतीतील प्रयोगशीलतेचे कौतुक केले.


या भेटीमुळे कंदर परिसरातील प्रगत शेतीची दखल राज्याबाहेरही घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात युनायटेड किंगडम येथील जागतिक बँकेच्या सल्लागार लुशी म्याथुसन यांनीही पराडे यांच्या शेतीला भेट देऊन पाहणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!