जुन्या वादातून सावडी येथे अविनाश तळेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :सावडी येथे जुन्या वादाच्या कारणावरूनअविनाश संतोष तळेकर या तरुणावर लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
श्री.तळेकर हे २२ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शेतातील पाण्याची मोटार सुरू करून त्यांच्या घरी परतत होते. सावडी गावाच्या हद्दीतील मांढरे वस्ती परिसरात पोहोचताच गावातील बाळासाहेब श्रीराम मांढरे याने त्याच्या दुचाकीने त्यांचा रस्ता अडविला. यानंतर आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करत लोखंडी रॉडने अविनाश तळेकर यांच्या कंबरेवर व डोक्याच्या मागील बाजूस वार केले. त्यानंतर दगड डोक्यावर मारल्याने ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले.
सध्या त्यांच्यावर बारामती येथे अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!