किरकोळ कारणावरून तरुणावर काठीने हल्ला

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता. ७ : शहरातील स्वामी समर्थ मंदिरासमोर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

यात करण अनिल पुंडे ,रा. देवीचा माळ, करमाळा यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले की मी व माझा मित्र कार्तिक अनिल मोरे आम्ही स्वामी समर्थ मंदिरासमोर उभे असताना दत्ता लावंड व अभिषेक गायकवाड (दोघे रा. करमाळा) तेथे आले. “तू रागाने का बघतो?” अशी विचारणा करत अभिषेक गायकवाड याने हातातील लाकडी काठीने माझ्या डोक्याच्या मागील बाजूस मारहाण करून जखमी केले. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या कार्तिक मोरे यालाही अभिषेक गायकवाड याने त्याच काठीने उजव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले. तसेच दत्ता लावंड याने मला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!