
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जिंती येथील सौ.सवितादेवी राजेभोसले यांच्या निवासस्थानी माढा तालुक्यातील कृषीनिष्ठ शेतकरी नितीन (बापू) कापसे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान शेती क्षेत्रातील विविध घडामोडी, आधुनिक शेती पद्धती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत विशेषतः केळी व द्राक्ष पिकांच्या लागवडीतील नवीन तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना, दर्जेदार उत्पादन, बाजारपेठेतील बदल, योग्य दर मिळविण्याचे मार्ग तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत करण्यासाठी परस्पर अनुभवांची देवाणघेवाणही करण्यात आली.

यावेळी संग्राम राजेभोसले, राहुल पाटील (सर), वाय. जी. भोसले (सर), अरुण (काका) गाडे, दत्तराज नवले, विकास पेटकर, विकास वीर, शंकर केसकर आणि सचिन येडे हे उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीमुळे शेतीविषयक विधायक संवादाला चालना मिळाली असून, भविष्यात शेतकरी हितासाठी विविध सकारात्मक उपक्रम राबविणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याबाबत उपस्थितांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.



