रस्त्याच्या वादातून महिलेला मारहाण

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी:
करमाळा, ता. २८ : कंदर येथील शेतातील जाण्याच्या वाटेच्या जुन्या वादातून एका 29 वर्षीय महिलेवर दगडाने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना शनिवारी (दि. 26) दुपारी घडली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्यादी समीर पठाण व संशयितांमधील शेतात जाण्याच्या रस्त्याचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. दि. 26 जुलै रोजी दुपारी त्या शेतात केळीची पिले कापत असताना मुद्दतसर मुमताज जहागीरदार व नुरुद्दीन महामुद्द काझी (दोघे रा. कंदर) तेथे आले.

याबाबत फिर्यादी समीर पठाण व संशयितांमधील शेतात जाण्याच्या रस्त्याचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. दि. 26 जुलै रोजी दुपारी त्या शेतात केळीची पिले कापत असताना मुद्दतसर मुमताज जहागीरदार व नुरुद्दीन महामुद्द काझी (दोघे रा. कंदर) तेथे आले.

मुद्दतसर जहागीरदार यांनी हातातील दगड डोक्यात मारून जखमी केले. तसेच “तुला जिवंत ठेवत नाही, तुम्ही रस्त्याने कसे जाता तेच बघतो,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!