मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात रक्तदानाचा महासंकल्प; ५५६ चे लक्ष्य पार

0

करमाळा | प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत…

करमाळा | प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी करमाळा शहर मंडळाच्या वतीने गायकवाड चौक येथील भाजपा संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५५६ रक्तपिशव्यांच्या संकल्पालाही मागे टाकत विक्रमी रक्तसंकलन केले.


विक्रम देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसेवा व समाजसेवेचा संकल्प करण्यात आला. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना विक्रम देशमुख म्हणाले की, गणेश चिवटे हे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांनी पक्षाचे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. राजकारणाबरोबरच समाजकारणातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या समाजसेवेचा, जनसंपर्काचा आणि कार्यकर्तृत्वाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.



‘संकल्पापेक्षाही अधिक रक्तसंकलन’

गणेश चिवटे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा पावसाचे वातावरण असूनही करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ५५६ रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प होता; मात्र नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा संकल्प पूर्ण होऊन अपेक्षेपेक्षाही अधिक रक्तसंकलन झाले. हे यश प्रत्येक रक्तदाता, कार्यकर्ता आणि समाजहिताची जाणीव असलेल्या नागरिकांचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपस्थिती

या प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, संजय घोरपडे, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, आजिनाथ सुरवसे, अमोल पवार, अशोक ढेरे, दिनेश मडके, राजश्री खाडे, संगीता नष्टे, हनुमंत रणदिवे, सोमनाथ घाडगे, हर्षद गाडे, अजित शिंदे, आण्णा पडवळे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, बंडू शिंदे, भैय्यासाहेब गोसावी, दादासाहेब येडे, जयंत काळे पाटील, तुषार जाधव, ईश्वर मोरे, दत्ता एकाड, कुणाल दुरंदे, दादा गाडे, गोकुळ अनारसे, दादासाहेब सरडे, हर्षल शिंगाडे, तात्यासाहेब शिंदे, संदीप काळे, सागर सरडे, रंजीत पवार, नानासाहेब अनारसे, जयसिंग भोगे, जयसिंग घाडगे, सुनील नेटके, संजय ढेरे, दीपक गायकवाड, अशोक मोरे, संजय दुर्गुळे, आण्णा साळुंखे, लक्ष्मण शेंडगे, ऋषिकेश फंड, गिरीश वाशिंबेकर, विश्वनाथ ढेरे, समाधान कांबळे, प्रकाश ननवरे, सुनील जाधव, रणजीत वीर, आबा वीर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि करमाळा शहर-तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!