गटारींतील सांडपाणी रस्त्यावर आल्याने कृष्णाजीनगर मधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू

करमाळा शहरातील कृष्णाजी नगर भागातील सार्वजनिक गटारी फुटलेल्या आहेत. त्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या सगळीकडे डेंग्यू मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार चालू आहेत. करमाळा नगर पालिकेकडे तक्रार करून देखील काहीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सध्या कृष्णाजीनगर मधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. नगरपालिकेने या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी.
– श्री चंद्रकांत स्वामी, कृष्णाजी नगर करमाळा
आपल्या भागातील समस्या मांडण्यासाठी ८४५९४३६३६३ या WhatsApp वर क्रमांकावर फोटोसहित तुमच्या शब्दात माहिती पाठवा.







