बारावी बोर्ड परीक्षेमध्ये श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केमचे घवघवीत यश

केम(संजय जाधव)- नुकत्याच झालेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम चा कला शाखेतील ग्रामीण भागातील उपक्रमशील कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या कॉलेजचा सरासरी निकाल 89.09% इतका लागला आहे. यावर्षी या कॉलेज मधील एकूण 110 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एकूण 98 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले एकूण 02 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये एकूण 11 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये एकूण 56 विद्यार्थी, तर 29 विद्यार्थी तृतीय श्रेणी मध्ये यश प्राप्त केले आहे.

कु. कांबळे तेजस्विनी वाल्मीक 77.17% प्रथम क्रमांक, तर कुमारी तळेकर वैष्णवी ज्योतीराम 76.33% हिचा द्वितीय क्रमांक आणि ननवरे निलेश नितीन या विद्यार्थ्याने 73.83% गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे.
यावर्षीच्या निकालाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामध्ये येथील ग्रामीण भागातील आर्ट्स शाखेमध्ये शिकणाऱ्या या वाडी वस्तीवरील, सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखविली आहे.

या सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेजचे प्राचार्य श्री माधव बेले, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक वर्ग, सर्व विद्यार्थी व केम परिसरातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
यावर्षी श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल, केम केंद्रात बारावीची परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत घेण्यात आली. प्राचार्य बेले यांनी ही मोहीम प्रभावीपणे राबवली. त्यांनी संस्थेची सूत्रे हातात घेतल्यानंतर शाळेत शिस्त प्रस्थापित झाली असून, या उपक्रमाचे तसेच निकालाचे पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

