करमाळ्यात उद्या जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा; जिल्हाभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग

करमाळा / संदेश प्रतिनिधी:
करमाळा दि. ४ : यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आणि सोलापूर इंग्लिश लॅंग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा–२०२६ बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता यशकल्याणी सेवाभवन येथे होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके व सोलापूर शहरातील तालुकास्तरावर निवड झालेले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त भरतराव शिंदे-पाटील राहणार असून डॉ. प्रचिती पुंडे, प्रा. डॉ. गणेश करे-पाटील हे प्रमुख पाहुणे तर अरविंद निलंगे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यावेळी इब्राहिम नदाफ, सचिन जगताप, प्रा. रामदास टोणे, नितीन कदम, प्रा. गुरुनाथ मुचांडे, प्रा. अशपाक काझी, प्रा. बाळकृष्ण लवंड, धनाजी राऊत, आबासाहेब दाढे, शशिकांत चांदणशिवे, आगतराव भोसले, कल्याणराव साळुंखे, गोपाळराव टाकीक, शरद शिंदे, सुखदेव गिलबिले, मारुती जाधव, प्रा. जयेश पवार, प्रा. विष्णू शिंदे तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील इंग्लिश लॅंग्वेज टीचर्स असोसिएशनचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबाबत आत्मविश्वास, प्रभावी संवादकौशल्य व वक्तृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




