दिग्विजय बागल व गणेश चिवटे यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार

करमाळा(प्रतिनिधी) :मुख्यमंत्री बळीराजा पाणंद (शेतरस्ता) समितीच्या करमाळा विधानसभा सह-अध्यक्षपदी दिग्विजय बागल यांची निवड तसेच भाजपच्या सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे यांची झालेली नियुक्ती यानिमित्त जगताप परिवाराच्या वतीने आयोजित घरगुती सत्कार समारंभात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते दोघांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना जयवंतराव जगताप म्हणाले, “जो दौडेगा वो मंजिल पाएगा.” आजचा काळ बदलला असून जो सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातो, त्यांच्या अडी-अडचणी सोडवतो, त्यालाच जनता नेता म्हणून स्वीकारते. वारशापेक्षा संघर्ष, कष्ट आणि स्वकर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या युवकांची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठांनीही कर्तृत्ववान युवकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी देशभक्त कै. नामदेवराव जगताप, स्व. आण्णासाहेब जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच माजी राज्यमंत्री स्व. दिगंबर बागल यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत १९८९ पासूनच्या राजकीय व सामाजिक प्रवासातील काही अनुभव कथन केले आणि दोन्ही सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती, ज्येष्ठ समाजसेवक श्रेणीकशेठ खाटेर, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, गटसचिव नेते बबन मेहेर, बाजार समिती संचालक जनार्दन नलवडे, बाजार समिती सचिव विठ्ठल क्षीरसागर, उद्योजक संतोषशेठ गुगळे, माजी नगरसेवक सुरेश इंदूरे, भाजपचे जगदीश अग्रवाल, सुहास घोलप, संजय घोरपडे, बाजार समिती संचालक मनोज पितळे, विक्रांत मंडलेचा, कॉन्ट्रॅक्टर भारत थिटे, अनिल सुरवसे, दत्तात्रय शिर्के, नितीन दळवे, लक्ष्मण थोरात, जोतीराम ढाणे, नगरसेवक युवराज चिवटे, नगरसेवक रोहीदास आलाट, नगरसेवक सचिन अब्दुले, विजय सरडे, प्राचार्य डॉ. तानाजी जाधव, मुख्याध्यापक अनिस बागवान, मुख्याध्यापक युसूफ शेख, बाजार समिती सहसचिव रवींद्र उकीरडे, शेखर जोगळेकर, मंगेश तरकसे, महेश ढाणे, दिगंबर रासकर, खरेदी-विक्री संघ संचालक हनुमंत ढेरे, शहाजी शिंगटे, बाजार समितीचे नूतन संचालक हनुमंत चांदणे, मयूर दोशी, उत्कर्ष गांधी, सुनील मेहता, अमृतशेठ कटारिया, अस्लम शेख, सादिक आतार, रविंद्र सपकाळ, चेतन आलाट आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. दत्तात्रय भागडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, श्रेणीकशेठ खाटेर, संजय घोरपडे आणि बबन मेहेर यांनी मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्ती दिग्विजय बागल आणि गणेश चिवटे यांनीही सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. तानाजी जाधव यांनी मानले.

