मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात १६६ जणांचे रक्तदान

0

करमाळा(प्रतिनिधी) :मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली शाखा करमाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १६६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.


शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर झोन प्रमुख इंद्रपालसिंह नागपाल महाराज, करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, दत्ता सरडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप, नगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेविका स्वाती फंड, महादेव आण्णा फंड, माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई वारे, ‘मदार’ चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी गौरव पफाळ, शिवसेना जिल्हा समन्वयक निलेश चांदगुडे, पत्रकार जयंत दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पूज्य इंद्रपालसिंह नागपाल महाराज यांनी संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या आध्यात्मिक आणि समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. करमाळा शाखेने आजपर्यंत ५,३०० युनिट रक्तदान केल्याची उल्लेखनीय कामगिरीही त्यांनी अधोरेखित केली.

उपस्थित मान्यवरांनी जागतिक स्तरावर शांतता, एकत्व, प्रेम आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत निरंकारी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.



या शिबिरात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या दमाणी ब्लड बँक, सोलापूर तसेच श्री रामभाई शहा रक्तपेढी, बार्शी यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर, वैशाली सरडे, विजया भुजबळ, मुकुंद साळुंके, डॉ. भाऊसाहेब सरडे, मनधीर शिंदे, आत्माराम वायकुळे, बप्पा धडस, अंगद पडवळे, दत्तात्रय कोल्हे, एकनाथ निमगीरे, सुनिल भोगे, राजेंद्र भुजबळ तसेच सर्व महिला व पुरुष सेवादल सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले, तर शाखामुखी पोपट थोरात यांनी उपस्थित मान्यवर, रक्तदाते आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!