अवैध वाळू वाहतूक प्रकरणातील पोथरे येथील तिघांची निर्दोष मुक्तता... -

अवैध वाळू वाहतूक प्रकरणातील पोथरे येथील तिघांची निर्दोष मुक्तता…

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१ : येथील पोलीस ठाण्यात सन २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या अवैध वाळू वाहतूक प्रकरणात न्यायालयाने पुराव्याअभावी पोथरे येथील तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणात पोथरे (ता. करमाळा) येथील रविंद्र सुभेदार झिंजाडे व महेश अशोक झिंजाडे व सुभेदार झिंजाडे यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम ३७९ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि गौण खनिजासंदर्भातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी ट्रॅक्टर, डंपिंग ट्रॉली व वाळू जप्त करून कारवाई केली होती.
या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाला आरोपींविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करता आले नाहीत. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचे परीक्षण केल्यानंतर न्यायाधीश अमित शर्मा यांनी पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.
आरोपींच्या वतीने ॲड. डॉ. बाबूराव हिरडे व ॲड. सचिन हिरडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती, जप्ती प्रक्रियेतील त्रुटी तसेच पुराव्यांतील उणिवा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!