एकाच छताखाली शासकीय सेवा; कंदर येथे ३१ जुलैला महसूल समाधान शिबिर -

एकाच छताखाली शासकीय सेवा; कंदर येथे ३१ जुलैला महसूल समाधान शिबिर

0

कंदर (संदीप कांबळे): करमाळा तालुक्यातील कंदर येथील साईकृपा मंगल कार्यालयात शुक्रवार, दि. 31 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तहसील कार्यालय, पुरवठा विभाग, सेतू कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य विभाग, एसटी महामंडळ, पंचायत समिती करमाळा, भूमी अभिलेख विभाग, संजय गांधी व श्रावणबाळ योजना, आरटीओ विभाग, पशुवैद्यकीय विभाग, महावितरण तसेच भारत गॅस आदी विभागांच्या विविध योजनांची माहिती व लाभ नागरिकांना मिळणार आहेत.

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!