कंदर येथे गोदावरी धाम सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांची धावती भेट

कंदर(संदीप कांबळे): करमाळा तालुक्यातील कंदर येथे गोदावरी धाम सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी धावती भेट देत ग्रामस्थांना कृपाशीर्वाद दिले.
महंत रामगिरीजी महाराज यांच्या आगमनानिमित्त कंदर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक व ग्रामस्थांना आशीर्वाद देत समाजात एकोपा, सद्भावना आणि आध्यात्मिक मूल्ये जोपासण्याचे महत्त्व सांगितले.
यावेळी कंदरचे माजी सरपंच भास्कर अण्णा भांगे, धनाजी शिंदे, विठ्ठल बबन यादव, विक्रम देवडकर, सागर डोके, सोनू भोसले, पप्पू भगत, सचिन जाधव, नवनाथ देवकर, विजय शिंदे, बाळासाहेब घाडगे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
