१४ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

0

करमाळा, संदेश प्रतिनिधी :
तालुक्यातील पिंपळवाडी येथील १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, पालकांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळवाडी येथील रहिवासी  मजूर  महिलेने  फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा इयत्ता नववीत शिक्षण घेत असून, दि. २७ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला होता. दरम्यान, फिर्यादी व त्यांचे पती मजुरीसाठी करमाळा येथे गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर मुलगा घरी न आल्याचे लक्षात आले.

त्यानंतर नातेवाईक, परिसर व इतर ठिकाणी रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र मुलाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने मुलाला पालकांच्या कायदेशीर संरक्षेतून त्यांच्या संमतीशिवाय पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!