
केम(संजय जाधव): शासनाच्या विविध योजनांमधून केम (ता. करमाळा) मधील विविध विकासकामांसाठी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्ता डांबरीकरण, काँक्रीटीकरण, समाज मंदिर बांधकाम, मंदिर सभा मंडप बांधकाम आदी कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.
आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्या कल्याणी अजित तळेकर आणि पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बिचितकर यांच्या माध्यमातून विविध योजनांमधून हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी सरपंच अजित तळेकर यांनी दिली.

मंजूर निधीतून पुढील विकासकामे करण्यात येणार आहेत –
गट ‘अ’ योजना : केम गुटाळ वस्ती ते सातोली रस्ता डांबरीकरण – ₹२५ लाख
आमदार निधी : श्री शंकरेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधकाम – ₹१० लाख
आमदार निधी : श्री केमेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधकाम – ₹१० लाख
नागरी सुविधा योजना : बंडू खरवडे ते जुने पोस्ट ऑफिस रस्ता काँक्रीटीकरण – ₹१० लाख
दलित वस्ती सुधार योजना : शंभूनगर येथे समाजमंदिर बांधकाम – ₹७ लाख

या निधीमुळे केम गावातील रस्ते, धार्मिक स्थळे आणि सामाजिक सुविधांच्या विकासाला गती मिळणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सरपंचांनी मानले आभार
केम गावाच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल सरपंच सारिका कोरे यांनी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. कल्याणी अजित तळेकर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बिचितकर तसेच या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

