यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील शिवमची ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड

0

करमाळा (दि.२६) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार शिवम राजेंद्र चिखले याची बिहारमध्ये होणाऱ्या ७ व्या खेलो इंडिया गेम्स २०२५ साठी निवड झाली आहे.

अलीकडेच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात आणि फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुजरात मधील मरीदा (ता. नाडियाद, जि. खेड़ा) येथे आयोजित करण्यात आलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय धर्नुविद्या स्पर्धेमध्ये शिवमने १७ वर्षे वयोगटातील रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्पर्धेतील शिवमच्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या आणि गुणांकनाच्या आधारे त्याची भागलपूर, बिहार येथे ४ मे ते ७ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या ७ व्या खेलो इंडिया गेम्समध्ये निवड झाली आहे.

शिवमचे प्रशिक्षण महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रा. रामकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या गौरवसंधीबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे तसेच कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी शिवमचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!