कृषी विभागाच्या वतीने १५ मे ला खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

करमाळा(ता. १४)– करमाळा तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक गुरुवार, दि. १५ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुप्रीम मंगल कार्यालय, कुंभेज फाटा येथे होणार असून, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीचे आयोजन तालुका कृषी अधिकारी श्री. देवराव चव्हाण यांनी केले असून, करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व शेतकरी भगिनींना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी बी-बियाणे, खते, कीड नियंत्रण, पाणीसाठा व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन या बैठकीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी कृषी विभागाने ही बैठक आयोजित केली आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून बैठकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




