वृक्षरोपणाचा संदेश देणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा  ता.१: साडे (ता. करमाळा) येथील संजय शिंदे यांची कन्या वैष्णवी व संजय कापरे यांचे चिरंजीव तानाजी यांचा विवाह दि. २९ एप्रिल रोजी साडे येथील स्वप्निल मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याची विशेष बाब म्हणजे पारंपरिक सत्कारात फेटे व शालीचा वापर टाळून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. वसुंधरा परिवाराचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. विजय खंडागळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांना वृक्ष देऊन “एक आयुष्यभराची सावली” देण्याचा सुंदर संदेश समाजासमोर ठेवण्यात आला.

या अभिनव उपक्रमामुळे विवाह सोहळ्याला वेगळे सामाजिक महत्त्व प्राप्त झाले असून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून देणाऱ्या शिंदे व कापरे या दोन्ही परिवाराचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!