बिटरगाव (श्री)येथे अल्पवयीन मुलगी बेपत्ता-अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल -

बिटरगाव (श्री)येथे अल्पवयीन मुलगी बेपत्ता-अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१६ : बिटरगाव श्री येथे पावणे सतरा वर्षांची (१६ वर्षे १० महिने) मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीची आई मजुरी करून उदरनिर्वाह करते. कुटुंबात पती, १६ वर्षे १० महिने वयाची मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता आई-वडील दोघेही मजुरीसाठी कामावर गेले होते. त्यावेळी मुलगा व मुलगी घरीच होते.

दुपारच्या सुमारास मुलगा कामाच्या ठिकाणी येऊन आई-वडिलांना सांगितले की, “मुलगी शेतातून गवत आणण्यासाठी गेली होती, मात्र ती परत आलेली नाही.” ही माहिती मिळताच आई-वडिलांनी तातडीने काम सोडून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सर्वत्र शोध घेऊनही मुलगी आढळून आली नाही.

मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!