तहसीलदार विजय तळेकर यांच्यावतीने केम जि. प. शाळेला दोन कॉम्पुटर संच भेट
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम गावचे सुपुत्र व पनवेलचे तहसीलदार विजय शिवाजी तळेकर यांनी आपले वडील कै. शिवाजी (बापू ) जनार्दन तळेकर यांच्या स्मरणार्थ केम मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन कॉम्पुटर संच भेट दिले. विजय तळेकर यांचे बंधू महेश तळेकर यांनी ते शाळेला सुपूर्द केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून तहसीलदार विजय तळेकर यांच्या विविध सामाजिक कार्याबद्दल उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला ए. पी. ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील, पै. महावीर आबा तळेकर,प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर, युवा नेते दादासाहेब पारखे भाजप तालुका उपसरचिटणीस धनंजय ताकमोगे, जिल्हा परिषद शाळा केम व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय सोलापुरे उपाध्यक्ष सचिन रणशिंगारे, समाजसेवक संतोष रायचूरे, शाळेचे शिक्षक तळेकर गुरुजी वासकर गुरुजी व इतर महिला शिक्षक वर्ग व विद्यार्थी, पालक आदीजन उपस्थित होते.