चाळीस वर्षांपासून करत असलेल्या कार्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याने समाधानी : कृषीरत्न आनंद कोठडीया
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जन्मभुमीपेक्षा कर्मभूमी क्षेष्ठ मानत कार्य करत गेलो, करमाळ्याच्या जनतेने भरभरून प्रेम आणी संधी दिल्यामुळे जीवनात काहीतरी करू शकल्याचे समाधान आसल्याचे प्रतिपादन कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी केले.
जेऊर येथे कृषीरत्न आनंद कोठडी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विचारवंताच्या प्रभावामुळे भारावलेल्या काळात करमाळ्याचा व माझा अपघातानेच संबंध आला या ठिकाणी असलेल्या संधी पाहील्या आणी शहाणे करून सोडावे सकळ जन या उक्तीप्रमाणे काम सुरू केले. तालुक्यातील मुलभूत प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून काम केले.लोकांचा सहयोग मिळाला यश मिळाले तालुक्यातील गावोगावी अनेक कार्यकर्ते तयार करू शकलो.
आज या कामाचे सकारात्मक परिणाम पाहील्यानंतर मन कृतार्थ होते.करमाळ्याच्या जनतेच्या कायम प्रेमात राहणेच पसंत करेन . यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित् त्यांना निरामय दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन आशिर्वाद घेतले यामध्ये. लोकविकास डेअरीचे दिपक आबा देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती अतुलभाऊ पाटील जिल्हा दुधसंघाचे संचालक अरूण चौगुले सर राजेरावरंभा फार्मर्स प्रोडयूसर कंपनीचे डॉ विकास वीर, जेऊरचे माजी सरपंच राजूशेठ गादिया, प्रसिद्ध व्यापारी प्रसन्न बलदोटा,परेशशेठ दोशी,विक्रम शहा, बळीमामा जाधव,लोकविकास फार्मर्स कंपनी शेटफळचे संचालक नानासाहेब साळूंके, विजय लबडे, विष्णू पोळ, महावीर निंबाळकर इंजी शहाणे साहेब , स्टॅम्प व्हॅंडर वीर बंधू, सेवानिवृत्त मंडल कृषी अधिकारी निळकंठ अभंग. केळी निर्यातदार किरण डोके यांच्याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन गजेंद्र पोळ यांनी केले.