होळीनिमित्त उत्तरेश्वराच्या शिवलिंगाला वडाच्या पारंब्यांची आरास

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) :केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर महाराजांच्या शिवलिंगाला होळी सणानिमित्त वडाच्या पारंब्यांची सुंदर अशी आरास करण्यात आली होती. ही आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती सोमवारी होळी सणानिमित्त हि आरास केली होती या मंदिरात प्रत्येक सणाला शिवलिंगाला आरास करण्याची प्रथा आहे. ही आरास पुजारी समाधान गुरव व त्यांना साथ देणारे समाधान बिचितकर, केदार पळसकर, सुबोध दौंड, समाधान फरडे,शंकर देवकर यांनी ही आरास केली. सोमवार निमित्त भाविकांची गर्दी झाली होती. या आरासाचे भाविकांनी कौतुक केले.
