घारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी सरवदे यांची निवड

करमाळा : घारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक ८ मार्च रोजी पार पडली. या निवडणुकीत सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सौ.सरवदे या माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटात कार्यरत आहेत.

या निवडीवेळी उपसरपंच सतीश पवार, माजी सरपंच लोचना पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता होगले, सदस्य आशा देशमुखे ,माजी सरपंच अनिता भोसले, सदस्य दत्तात्रय मस्तुद आदीजन उपस्थित होते. या सर्वांनी लक्ष्मी सरवदे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड केली.
सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अनिल ठाकर यांनी काम पाहिले. याचबरोबर तलाठी मयूर क्षिरसागर, सहाय्यक सोमनाथ खराडे, घारगावचे ग्रामसेवक रवींद्र काळे यांनी या निवडणुकीचे काम पाहिले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष ऍड. शशिकांत नरुटे माजी सरपंच किरण पाटील, माजी सरपंच कल्याण होगले व ग्रामस्थ उपस्थित होते.