३९९ अंध व अपंग गरजु लोकांना वेणू वेंकटेशा व चूक्ला ट्रस्टच्या वतीने तिरुपति बालाजीचे दिले मोफत देवदर्शन

करमाळा : अष्टोधरा शत:१०८ चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट (हैदराबाद )व वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट (रावगांव ) यांच्या मार्फत दिनांक ५ मार्च ते ८ मार्च दरम्यान तेलंगना राज्यातील श्री तिरुपति बालाजी देवदर्शन यात्रेचे आयोजन केले होते अशी माहिती रावगाव (ता.करमाळा) येथील तिरुपति बालाजी मंदिर निर्माणचे अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी दिली.

यामध्ये समाजातील विविध स्तरातील अंध अपंग, दुर्लक्षित भाविकांना मोफत प्रवास,भोजन, निवास, देवदर्शन देण्यात आले होते. अष्टोधरा शत:चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट ने व वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट हे सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असते. कोरोना काळामध्ये आपत्ती, व्यवस्था मध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ट्रस्टने समाजातील लोकांच्या भावना ओळखुन या यात्रेचे नियोजन केले होते.
चुक्ला ट्रस्ट चे अध्यक्ष वेणु कुमारजी चुक्ला, यांचे आर्थिक पाठबळ वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट, तिरुपति बालाजी मंदिर निर्माण रावगांव चे अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांच्या नियोजन व व्यवस्थापनाने ही यात्रा संपन्न झाली. या यात्रेमध्ये गणेश पाटील,अमोल पाटील, योगेश पाटिल,हरिनाथ गोंड,कुणालजी घुंगारडे, यांचे मार्गदर्शन लाभले.
