कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदी दिलीप तळेकर यांची निवड
केम(प्रतिनिधी/संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप संदिपान तळेकर यांची कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदी तर उपाध्यक्षपदी किरण दोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कुर्डूवाडी येथे जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी सर्व संचालक मंडळाची मीटिंग बोलवण्यात आली होती. सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे, माढा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. चेअरमन पदासाठी दिलीप संदिपान तळेकर व्हाईस चेअरमन पदासाठी किरण दोशी यांचा एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या. या वेळी जनता सहकारी बॅंकेचे संचालक फुलचंद धोका अरूण,गिडडे सुरेश शहा विक्रम बोराडे अर्जुन बागल विजयसिंह परबत अनिल कुमार पाटील, मोनिका शहा सुलभा दिंडे, अशोक खाडे,अनिल कुमार तरटे चंद्रशेखर क्षीरसागर, दिलीपचंद धोका संचालक उपस्थित होते.
या निवडीनंतर चेअरमन व व्हाइस, चेअरमन यांचा सत्कार कुर्डूवाडी जनता बँकेचे वतीने करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,सरपंच आकाश भोसले, ग्रामपंचायत सदस्य राहुल कोरे, आप्पा ननवरे उपस्थित होते.
निवडी बद्दल दिलीप तळेकर म्हणाले की,”जनता बँकेच्या संचालकांनी माझ्यावर हा जो विश्वास टाकलाय याला तडा जाऊ न देता मी बँकेचा कारभार कारभार पारदर्शकपणे करीन.”
विधानपरिषद आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटिल यांनी या निवडीचे स्वागत केले. या निवडीनंतर केम ग्रामस्थांनी दिलीप तळेकर यांचे अभिनंदन केले.