दहिगाव उपसा सिंचनचे पाणी आम्हाला सोडा अन्यथा आंदोलन करणार – साडे येथील महिला शेतकऱ्यांचे निवेदन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – दहिगाव उपसा सिंचन योजनेचे साडे गावाच्या वाट्याचे पाणी आम्हाला मिळावे अशा मागणीचे निवेदन साडे(ता.करमाळा) येथील महिला शेतकऱ्यांनी करमाळा तहसीलदारांना काल (दि.२७) दिले आहे. तसेच ३१ मार्च पर्यन्त हे पाणी सोडले नाही तर आम्ही सर्व महिला ३ एप्रिलला करमाळा तहसिल कार्यालयावर मोर्चा घेऊन येऊ. या मोर्चातूनही दखल न घेतल्यास १० एप्रिल रोजी ‘तहसिल समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही महिला शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही उन्हाळी पिके केलेली असून पाण्या अभावी उभी पिके जळून चालली आहेत. साडे येथील आजींनाथ आडेकर व वसंत बदर गुरुजी यांच्या रानातून दहिगाव उपसा सिंचनचा कॅनॉल (चारी नंबर ४) जात आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे साडे गावाच्या वाट्याला जेवढा हिस्सा आहे ते पाणी या कॅनॉलला सोडले तर फायद्याचे असून यामुळे ‘सरकारी तलाव’ भरून या पाण्याचा फायदा संपूर्ण गावाला होईल. तरी आम्हाला ३१ मार्च पर्यंत पाणी सोडावे. जर पाणी सोडले नाहीतर सर्व महिला ३ एप्रिलला करमाळा तहसिल कार्यालयावर मोर्चा घेऊन येऊ. या मोर्चातूनही दखल न घेतल्यास १० एप्रिल रोजी ‘तहसिल समोर आमरण उपोषण करण्यात येईल. दिलेल्या निवेदनावर खालील महिलांच्या सह्या आहेत.
१) सविता केशव लोंढे (मा.ग्रामपंचायत सदस्या)
२) मनीषा दादा गायकवाड़
३) संगीता बाबू ढवळे
४) मडम निजाम शेख
५) कमल आबासाहेब देवडे
६) शरयू बालभीम सुपे
७) लक्ष्मी दादा आडेकर
८) पुष्पा आप्पा नेमाने
९) हिराबाई महादेव माने
१०)आशाबाई गणपत गुळवे
११) स्वाती ज्ञानदेव गुळवे
१२) गंगुबाई दादाहरी दळवे
१३) कोंताबाई दत्तात्रय गोमे
१४) अर्चना रोहिदास गोमे
१५) प्रियंका प्रवीण बनसोडे
या निवेदनाच्या प्रति १) पाटबंधारे अधिकारी, दहिगाव उपसा सिंचन करमाळा 2) तहसिलदार,करमाळा 3) संजयमामा शिंदे, आमदार करमाळा 4) पोलिस निरीक्षक, करमाळा पोलिस स्टेशन यांना दिल्या आहेत.