आंबेडकर जयंतीनिमित्त करमाळा येथे व्याख्यान,बूद्धिबळ स्पर्धा,राज्यस्तरीय डान्स स्पर्धाचे आयोजन
करमाळा: येत्या १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त करमाळा येथील शिव फूले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये व्याख्यान,बूद्धिबळ स्पर्धा,राज्यस्तरीय डान्स स्पर्धा,भव्य मिरवणूक असे भरगच्च नियोजन असणार आहे व मोठ्या उत्साहात सर्व कार्यक्रम पार पाडणार आहेत अशी माहिती उत्सव समितीचे संस्थापक नागेश कांबळे यांनी दिली.
भव्य मिरवणूकचे उद्घाटन प्रा.डॉ.सुभाष कदम (दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा) यांच्या हस्ते असणार आहे. यावेळी पंढरपूर येथील युवा नेते दीपक चंदनशिवे, करमाळा येथील यशकल्यानी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचे नुकतेच प्रकाशन
डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक,करमाळा येथे करण्यात आले. यावेळी नागेश कांबळे,दिपक ओहोळ,इसाक पठाण, लक्ष्मण भोसले, प्रफुल्ल दामोदरे,भिमराव कांबळे,नंदकुमार कांबळे,नामदेव वाघमारे ,बौद्धाचार्य बाळासाहेब कांबळे,भिमा कांबळे,रणजित कांबळे, कालिदास पवार,गोट्या कांबळे,संदिपान धाकतोडे,प्रमोद गायकवाड मयूर कांबळे,विजय वाघमारे इ उपस्थित होते