सेवेत असताना नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता..30) : झरे (ता.करमाळा) येथील सैन्यात नाईक सुभेदार म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर बापुराव बागल (वय-39) यांचे सेवेत असतानाच ग्वाल्हेर येथे काल (ता.29) ला निधन झाले. त्यांचे निधनाचे वृत्त समजताच झरे गावावर दुःखाची छाया पसरली आहे.
नाईक सुभेदार बागल यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 ला झाला. त्यांचे बालपण व प्राथमिक,माध्यमिक शिक्षण झरे येथे झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे विद्यार्थीसहाय्य समितीत राहून झाले. त्यानंतर ते 25 जानेवारी 2003 लाख सैन्यात दाखल झाले. त्यांना बढती मिळून सध्या नाईक सुभेदार यापदावर कार्यरत होते.
ते सध्या ग्वाल्हेर-८ येथे सेवेत होते.आज सकाळीच त्यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त समजले. यानंतर झरे गावात शोककळा पसरली आहे.गायनसम्राट बापुराव बागल महाराज यांचे ते चिरंजीव होत,त्यांच्यामागे भाऊ मेजर ब्रम्हदेव बागल, आई,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
उद्या सकाळी 9 वाजता नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी दिली.