मांजराच्या पिलाचा कुत्रीला लागला लळा – स्वतःचे दुध पाजून करत आहे सांभाळ…
करमाळा : (प्रशांत नाईकनवरे) : आपल्या कळपात जर चुकून दुसरं जनावर आलं, तर त्याला हुसकावून बाहेर काढलं जातं सामान्य माणसांकडून स्वतःच्या मुलाचे कोडकौतुक करत असताना दुसऱ्याच्या मुलांला मात्र वेगळी वागणूक मिळते, हे आपण नेहमी व्यवहारात पाहात आलो आहे. माणसाला विचार करण्याची देणगी असताना माणसाकडून असा व्यवहार होतो, तर प्राण्यांनाडून इतर प्राण्यांशी चांगली वागणूकीची अपेक्षा करणं तर व्यर्थच असते. मात्र चिखलठाण (ता.करमाळा) येथील अर्जून मारूती गव्हाणे यांनी पाळलेली कुत्री याला अपवाद ठरत आहे.
या कुत्रीने आपल्या स्वतः ची पिल्ले सांभाळताना एका मांजराच्या पिल्लाला सुद्धा चांगलाच लळा लावला असुन चार महिन्यांपासून आपल्या पिल्लाबरोबरच त्या मांजराच्या पिल्लाला सुद्धा स्वतः चे दुध पाजून त्याचा सांभाळ करत आहे. अर्जुन गव्हाणे यांनी आपल्या शेतातील घराची राखण व्हावी यासाठी तीन वर्षांपासून आपल्या शेतातील घरी एक कुत्री पाळलेली आहे.
पाच महिन्यांपूर्वी ती व्याल्यानंतर तीला चार पिल्ले झाली याचं दरम्यान गव्हाणे यांना एक मांजराचे पिल्लू अन्नच्या शोधात फिरत असताना रस्त्यावर दिसले त्याला त्यांनी आपल्या घरी आणले त्याला नियमित म्हशीचे दुध व भाकरी चारत असत पण ते पिल्लू या कुत्रीची पिल्ले आपल्या आईला पित असताना तिथे ओरडत जात आसे. एके दिवशी त्या कुत्रीमधील आई जागी होऊन आपल्या जन्मदात्या आईपासून दुरावलेल्या या पिलासाठी तिचा पान्हा फुटला व ती त्या मांजराच्या पिल्लालाही दररोज नियमितपणे पाजू लागली.
कुत्रीच्या पिकांबरोबरच तेही मोठं होऊ लागलं त्याचाही ती आपल्या पिलाप्रमाणेच सांभाळ करत आहे. मांजराच्या पिलाला दुध पाजण्याचा हा चार महिन्यांपासून नियमितपणे कार्यक्रम सुरू होता मात्र एके दिवशी त्यांच्या शेजारी असलेल्या सचिन गव्हाणे यांनी हे दृश्य पाहीले त्यांना आश्चर्य वाटल्याने त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये या सर्व प्रकारची प्रकाराची शूटिंग घेतली व ती क्लिप गावातील व्हाट्सअप ग्रुप वर पाठवली सध्या ही क्लिप मोबाईलवर सर्वत्र व्हायरल होऊ लागली आहे.