हनुमान जयंती निमित्ताने केम मध्ये रक्तदान शिबिर संपन्न

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील जय बजरंग बली मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात एकूण ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे शिबिर करमाळा येथील कमलाभवानी ब्लड बँक यांच्या सौजन्याने आयोजित केले होते.
या प्रसंगी प्रहार संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख सागर पवार म्हणाले आजच्या रोगराईच्या काळात रुग्णांना रक्तदानाची गरज आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या रूग्णाचा आपण जीव वाचवू शकतो. त्यामुळे रक्त दाना सारखे पुण्य कशात नाही. रक्त दान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावे असे त्यांनी आवाहन केले. तसेच मंडळाच्या वतीने मुलांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वेळी रमेश दादा पवार, माजी उपसरपंच भिमराव चौगुले, युवा नेते सचिन तळेकर, अध्यक्ष लक्ष्मण जाधव, युवा उद्योजक दशरथ पवार विक्रम धोत्रे, राहुल धोत्रे, समाधान पवार, महेशं शिंदे शेखर धोत्रे, मुन्ना धोत्रे, अनिल जाधव हनु सुकळे, अविनाश पेटकर, संजय पेटकर, रोहित धोत्रे विशाल धोत्रे आदीजन उपस्थित होते.