पोफळज येथे १ लाख ८५ हजाराची चोरी.. -

पोफळज येथे १ लाख ८५ हजाराची चोरी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोफळज (ता.करमाळा) येथे घरात घुसून घरातील कपाट उघडून चोरट्यांनी १ लाख ८४ हजार ५०० रूपयाची चोरी केली आहे. हा प्रकार ८ एप्रिलच्या मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी गौतम पंडित काळे रा. पोफळज यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी पोफळज येथे रेल्वे स्टेशनवर क्लार्क म्हणून कार्यरत आहे. ८ एप्रिलला जेवण करून आम्ही झोपलो होतो. पहाटे दोन वाजता जागे झालो असता, घरातील बाजुच्या खोलीतील बल्ब बंद दिसला. त्यामुळे तेथे जावून पाहिले असता लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला व संसारपयोगी साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्यानंतर कपाटातील दागिणांचा शोध घेतला असता सोन्याची अंगठी, सोन्याचे मणी, सोन्याचे पदक, छुपका, नेकलेस, मंगळसुत्र, गंठन असे साधारणतः ५३.५० ग्रॅम सोन्याचे दागिणे व रोख रक्कम ३० हजार रूपये तसेच महादेव खरात यांची १५ हजार रूपये किंमतीची होंडा मोटारसायकल व नवनाथ सुरवसे यांचा ४०० रूपयाचा मोबाईल असा एकूण १ लाख ८४ हजार ५०० रूपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुलकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!