नायब तहसीलदार प्रकाश मुसळे यांचा सत्कार संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता. ९: करमाळा येथील रहिवासी असलेले व कुडूवाडी येथील प्रांत कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदारपदी कार्यरत असलेले प्रकाश मुसले यांची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल येथील ग्रामसुधार समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे.
ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांच्या हस्ते श्री. मुसळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसुधार समितीचे सचिव डी. जी. पाखरे, ॲड. अकाश मंगवडे तसेच सामाजिक कार्यकर्तेअर्जुन आबा तकीक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मी करमाळ्यात वाढलो व घडलो. मी कुठेही सेवेत असतलोतरी माझी ओढ कायम करमाळ्याकडेच राहणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे मी नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहे. जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा मी करमाळ्यासाठी कायम वेळ काढेल व जेवढी चांगली कामे करता येथील तेवढी कामे करेल. (प्रकाश मुसळे- नायब तहसीलदार, शिरूर)

←