करमाळ्यात प्रथमच ‘नवभारत इंग्लिश स्कूल’मध्ये थ्रीडी शो..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये मुलांना थ्रीडी शो दाखवण्यात आला. करमाळा तालुक्यामध्ये प्रथमच असा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमास उदंड असा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला.
या शोमध्ये ब्रह्मांड कसे आहे, आपली पृथ्वी कशी निर्माण झाली, चंद्रावर उतरलेले पहिले मानव, आफ्रिकन शार्क, डायनासोर याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना शो द्वारे दाखवण्यात आली. हा शो पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गॉगल मुलांना देण्यात आले होते. नुकतीच परीक्षा पूर्ण झाल्यामुळे मुलांनी या कार्यक्रमाचा भरपूर आनंद लुटला.
या कार्यक्रमासाठी वाशिंबेकर, अग्रवाल, पवार, ओतारी, चिवटे, कोकीळ, डॉ.भोसले, अभंग , बनगर, गुगळे आदी पालक वर्ग ही उपस्थित होते. त्याचबरोबर इतर शाळेतील मुलांनीही या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी 300 विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या संचालिका सुनिता देवी यांनी या कार्यक्रमाची कल्पना सुचवली. कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहिते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.