अज्ञात चोरट्यांनी रस्त्याने न जाता ऊसातूनच पळवून नेला ट्रॅक्टर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथील शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात सायंकाळी लावलेला ट्रॅक्टर, अज्ञात चोरट्यांनी हा ट्रॅक्टर ट्रॉली जाग्यावरच सोडवून रस्त्याने न जाता चक्क ऊसातूनच ट्रॅक्टर पळवून नेला आहे. ही घटना आज (ता.२०) पहाटेच्या सुमारास घडली आहे.

सदर ट्रॅक्टर एमएच 45 एक्यू २७०५ या क्रमांकाचा असून, हा सुनिता संजय पठाडे (रा.उमरड) यांच्या नावावर हा ट्रॅक्टर आहे. या चोरीमुळे परिसरातील ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात हकीकत अशी की, पठाडे यांनी शेतीच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर घेतला होता. शेतात ऊसाची लागण करण्यासाठी लागणारे ऊस बेणे आणून ट्रॅक्टर ऊसाच्याच शेतात लावला होता. या ट्रॅक्टरसोबत ट्रॉलीपण होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली जागेवरच सोडून ट्रॅक्टर पळवून नेला. हा ट्रॅक्टर चोरी करताना वस्तीच्या रस्त्याने न घेवून जाता चक्क चोरट्याने उसातून मांजरगाव रस्त्याने ट्रॅक्टर नेला आहे. ट्रॅक्टर मालकाने परिसरात शोधाशोध केली मात्र ट्रॅक्टर मिळून आला नाही. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ या चोरांचा तपास लावावा, अशी मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे. सदर ट्रॅक्टर एमएच 45 एक्यू २७०५ या क्रमांकाचा हा असून, कोणाला दिसल्यास 7387156515 व 8275448096 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत करमाळा पोलिसात त्यांनी तक्रार दिली असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.
