केळीच्या पिका संदर्भात शेतकऱ्यांना फार मोठ्या संधी उपलब्ध - केळीपिक तज्ञ संतोष चव्हाण -

केळीच्या पिका संदर्भात शेतकऱ्यांना फार मोठ्या संधी उपलब्ध – केळीपिक तज्ञ संतोष चव्हाण

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : केळी उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम केळी उत्पादनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यु.एस.के ॲग्रोचे केळी पिकतज्ञ संतोष चव्हाण यांनी शेटफळ (ता.करमाळा) येथे सिद्धीविनायक ॲग्रो एजन्सी व लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित केळी पिक चर्चासत्र कार्यक्रमात बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील होते पुढे बोलताना श्री चव्हाण म्हणाले की, केळीच्या पिका संदर्भात शेतकऱ्यांना फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत केळी दराची बाब पूर्णतः मागणी पुरवठ्यावर अवलंबून असली तरी गुणवत्ता पूर्ण केळीला मागणी व दर कायम राहणार असल्याने पुढील काळात या पिकासंदर्भात योग्य तांत्रिक माहिती घेऊन शेतकऱ्यांनी पिकाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

पिकासंदर्भात पाणी खत व्यवस्थापन याची माहिती दिली. यावेळी बोलताना केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील म्हणाले की सध्या आखाती देशात निर्यात होत असली तरी भविष्यात युरोपात निर्यातीचे ध्येय ठेवले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. त्या देशाच्या मागणीनुसार उत्पादन घेतले पाहिजे मग दर चांगला मिळू शकतो. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी सुरू असलेले नविन प्रयोग पहाण्यासाठी गेले पाहिजे व नवीन ज्ञान आत्मसात केले पाहिजे.प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांचे स्वागत रोहित लबडे व अशोक लबडे यांनी केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे गजेंद्र पोळ यांनी केले. आभार प्रशांत नाईकनवरे यांनी मानले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सिद्धीविनायक ॲग्रो एजन्सीच्या वतीने विविध पिकांसाठी उपयुक्त किट उपस्थित शेतकऱ्यांना भेट देण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड,आदिनाथचे माजी संचालक सुरेश पोळ, प्रगतशील शेतकरी कैलास लबडे, विलास लबडे, अमोल घोगरे, भाऊसाहेब लबडे,लहु पोळ,लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे वैभव पोळ, विजय लबडे, नानासाहेब साळूंके हांबीराव नाईकनवरे.गणेश मोरे,सागर रोंगे, अण्णासाहेब लबडे, आबासाहेब लबडे, सुरेश आवळे यांच्यासह या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!