मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी चिखलठाण भागात घेतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी.. -

मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी चिखलठाण भागात घेतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) या परिसरातील वादळी वाऱ्याने केळी पिकाच्या नुकसानीची मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी शेतकरी दत्तात्रय गुंड, जोतीराम डीगे, महिला शेतकरी हर्षाली नाईकनवरे, पुरूषोत्तम पोळ यांच्या पिकाची पहाणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी दिल्या, तसेच त्यांच्याशी चर्चा करून शासकीय यंत्रणेला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२८ एप्रिलच्या दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याचा चिखलठाण, शेटफळ परिसरातील केळी पिकाला मोठा फटका बसला आहे, अनेक शेतकऱ्यांची केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तहसीलदार विजय जाधव व तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात पाठवून झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली आहे.

ही माहिती शासनाकडे पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम लवकरच पुर्ण करण्यात येईल असे सांगितले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, याची माहीती मिळताच मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी शेटफळ, चिखलठाण, कुगाव येथील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांसमक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून त्यांना भरपाई मिळावी अशा सूचना केल्या आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी समक्ष भेटून भरघोस शासकीय मदत मिळणे बाबत विनंती करणार असल्याचेही श्री.बागल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!