गौंडरे येथे तरुणावर हल्ला – एकजण गंभीर जखमी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गौंडरे (ता.करमाळा) येथे आज (ता.३) भरदिवसा एका जणाने चाकुने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात समाधान रोहिदास निळ यांना गंभीर दुखापत झाली असुन, त्यांच्यावर सोलापूर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात हकीकत अशी की, जखमी समाधान रोहिदास निळ (रा.निमगाव) (ह) हे गौंडरे येथे काही कामानिमित्त आले असताना आरोपी पद्मसिंह छगन शिंदे यांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून पोटामध्ये भोकसले. यामध्ये समाधान निळ यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने सोलापूर येथे तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गुंजवटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस सबइन्स्पेक्टर प्रविण साने यांनी तातडीने आरोपीला गजाआड केले.
